ट्युनिशिया
ट्युनिशिया : (अरबी अल्-जम्हूरिया अत्-तूनिसिया). आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील छोटेसे अरब, मुस्लिम प्रजासत्ताक. क्षेत्रफळ १,६४,१५० चौ. किमी. लोकसंख्या ५५,०९,००० (१९७३). विस्तार २९° ५४' उ. ते ३७° २१' उ. व ७° ३३' पू. ते ११° ३८' पू. यांदरम्यान. दक्षिण–उत्तर जास्तीत जास्त अंतर ७२० किमी. पूर्व–पश्चिम ३२० किमी. किनारा १,२०० किमी. राजधानी ट्युनिस. अधिकृत धर्म इस्लाम, अधिकृत भाषा अरबी.